सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा

23 जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम शाळेच्या सभागृहात भरत होती सन १९८६ रोजी छोटा गट, मोठा गट व इ. १ लीचा वर्ग सुरु झाला.त्या वर्षी छोट्या गटात

२५ व मोठ्या गटात २८, इयत्ता पहिलीला २१ अशी विद्यार्थी संख्या होती. सन  १९८९  पासून हे वर्ग कन्या प्रशालेत भरू लागले. सन १९९० रोजी म.ए.सो. मुलांचे हायस्कूल मध्ये वर्ग भरू लागले. सन १९९१  रोजी शाळेची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. शाळेच्या इमारतीच्या एकूण सहा वर्ग खोल्या बांधण्यात आल्या इमारतीच्या पायाचे उद्घाटन प्रसंगी मा.मुख्याध्यापक श्री. मे.गो. गोसावी उपस्थित होते सन १९९१ साली स्वतंत्र इमारतीत दोन विभागात म्हणजे पूर्व प्राथमिक सकाळी व प्राथमिक शाळा दुपारी अशी शाळा भरू लागली सन १९८६ पासून विद्यार्थी संख्या वाढत गेली सन १९९२  साली दुसऱ्या तुकडीला मान्यता मिळाली व त्यामुळे १९९२ पासून इयत्ता तिसरी व चौथीचे तुकडी वाढल्याने, विद्यार्थी संख्या वाढल्याने वर्ग मुलांचे हायस्कूल येथे बसू लागले २०१३ पासून खेळवाडी चे दोन वर्ग कन्या विभागात सुरू करण्यात आले विद्यार्थी संख्या ७० इतकी होती.

अ.क्र. सन प्राथमिक विभाग
मुले मुली एकूण
१९८६ १२ २१
१९९१ २८५ २३८ ५२३
१९९७ ३०७ २४३ ५५०
२००३ २७१ २४० ५११
२००९ ३३४ २७१ ६०५
२०१५ ३२४ २८२ ६०६
२०१७ ३२४ २७१ ५९५
२०१८ ३१९ २८० ६०१
२०१९ २९७ २७३ ५८८

सन २०१३ रोजी शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन माननीय डॉ. यशवंतराव वाघमारे यांच्या हस्ते तर  मा. सहस्त्रबुद्धे सर, डॉ.व्हनकटे  सर स्थानिक शाळा समिती सदस्य यांच्या हस्ते झाले २०१५  पासून शाळेचा दुसरा मजला ही पूर्ण बांधून झाला पूर्णपणे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग शाळा स्वतंत्र इमारतीत भरू लागली एकूण सहा वर्गखोल्या वरच्या बाजूला नव्याने बांधण्यात आल्या यासाठी नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री सहस्रबुद्धे सर यांनी खूप प्रयत्न केले.

शाळेची स्थापना- 23 जून १९८६ शाळा मान्यता पत्र जा.क्र. दिनांक १ -२ -१९९४ नुसार.
जादा तुकडी मान्यता- जा. क्र. १७ / १० दिनांक १९-६ -१९९० नुसार.
स्वतंत्र मुख्याध्यापक पद मान्यता- जा. क्र.१७/२४६/९४/९५ दिनांक २ -६ -१९९४  नुसार.
स्वतंत्र क्लार्क मान्यता पत्र- जा. क्र. १७ /१०४  दिनांक ३ -७ -१९९६ नुसार.
स्वतंत्र शिपाई मान्यता पत्र जा.क्र.१७ / १०४  दिनांक ३ -२ -१९९६  नुसार.

इंग्रजी अध्यापन इंग्रजी विषय पहिलीपासून सन 2000 पासून शिकविण्यास सुरुवात. सेमी इंग्रजी शाळेत पहिलीपासून सुरू सन २०१५  त्यानंतर नैसर्गिक वाढ होऊन दरवर्षी सेमीचे वर्ग सुरू झाले.