शालेय उपक्रम प्राथमिक विभाग
गुरुवार दि.१०/१०/२०२४.रोजी शाळेत "सन्मान स्त्री शक्तीचा " व सामाजिक भोंडला घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सौ.मंगलकाकी सराफ यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ.पौर्णिमाताई तावरे उपस्थित होत्या. वर्गावर्गातून प्रातिनिधिक स्वरुपात कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .
१५ ऑक्टोबर ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त 'वाचन प्रेरणा दिन 'साजरा करण्यात आला. या निमित्त इ.१ली व इ.२ री या विद्यार्थ्यांनी शब्द वाचन, गोष्टींची चित्ररूप पुस्तके वाचन घेतले .शिक्षकांनी मुलांना ए.पी.जे .अब्दुल कलामयांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या.इ. ३री व ४थीच्या विद्यार्थ्यांनी गोलाकार बसून पुस्तकांचे वाचन केले तसेच वाचलेल्या पुस्तकावर चर्चा केली.त्यातून मिळालेला संदेश, गोष्टीचे तात्पर्य यावर चर्चा केली.मुलांनीही ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या गोष्टी सांगितल्या.'वाचनाचा घ्या ध्यास ,स्वत:चा होईल विकास 'हा प्रेरणादायी संदेश देऊन वाचन प्रेरणा दिन साजरा केला.
शाळेची सहल शिवनेरी किल्ल्यावर दि. १६-११-२०२४ रोजी गेली होती. अनुभव आधारित शिक्षण या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किल्ल्यावर नेऊन शिवजन्म विद्यार्थ्यांना अभ्यासता आला.
विद्यार्थ्यांची भाजी मंडईला भेट व पर्यावरण जनजागृती =आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना महात्मा फुले भाजी मंडईस भेट दिली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ओला कचरा, सुका कचरा तसेच रस्त्यावर थुंकू नका असे घोषवाक्य लिहून व सांगून भाजी मंडई त पर्यावरण जनजागृती केली.
क्रीडा करंडक सलग सातव्यांदा विजेती शाळा म.ए.सो.सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा. दिनांक १७, १८, १९ जानेवारी २०२५ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या म.ए.सो.क्रीडा करंडक स्पर्धांमध्ये म.ए.सो. सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा सलग सातव्यांदा क्रीडा चषकाची मानकरी ठरली.