पूर्व प्राथमिक शालेय उपक्रम २०२४-२५
-
भावी पिढी आरोग्यपूर्ण,निरोगी,उत्साही,क्रियाशील बनवायची असेल तर अष्टांग योगासारखा दुसरा कोणताही समर्थ असा उपाय नाही म्हणूनच शुक्रवार दि.२१ जून २०२४ रोजी योग दिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षक विद्यार्थी यातील दुवा म्हणजेच पालक. यांच्यात समन्वय असावा या उद्देशाने गुरुवार दि.२६ जून २०२४ पालक शाळेचे आयोजन करण्यात आले.

-
"गड्या चल रे गड्या चल रे गड्या पालखीला,पालखी चालली पंढरपुरा." विठोबा माऊली च्या गजरात छोट्या वारकऱ्यांनी शाळेच्या परिसरात पालखी मिरवून आणली.
-
गुरुवार दि.१०/१०/२०२४.रोजी शाळेत "सन्मान स्त्री शक्तीचा " व सामाजिक भोंडला घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सौ.मंगलकाकी सराफ यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ.पौर्णिमाताई तावरे उपस्थित होत्या. वर्गावर्गातून प्रातिनिधिक स्वरुपात कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .
बुधवार दि. ९/१०/२०२४ रोजी शाळेत नवदुर्गा पूजन करण्यात आले तसेच सर्व मुलांसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना खिरापत देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मंगळवार दि.१५/१०/२०२४ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. छोट्या मोठ्या गटातील मुलांची पुस्तकरूपी भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. मुलांना चित्र वाचन करण्यासाठी चित्र रुपी गोष्टींची पुस्तके वाचनासाठी देण्यात आली तसेच मोठ्या गटातील मुलांची शब्द वाचन स्पर्धा घेण्यात आली.
बुधवार दि.१६/१०/२०२४ रोजी शाळेत या वर्षात घेतला जाणारा उपक्रम कुटुंब प्रबोधन "वसुधैव कुटुंबकम " याच्या अनुशंघाने आजी -आजोबा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आजी -आजोबांचे औक्शण करून स्वागत करण्यात आले.त्यानंतर रॅम्प वॉक घेण्यात आला. त्यानंतर गमतीशीर खेळ व विविध अक्टीविटी घेण्यात आल्या. आजी -आजोबांनी या कार्यक्रमात नातवंडांबरोबर खेळ खेळण्याचा तसेच खाऊ खाण्याचा आनंद लुटला.
शुक्रवार दि.२७/१२/२०२४ रोजी कुटुंब प्रबोधन या उपक्रमाला अनुसरून "वसुधैव कुटुंबकम" विविधतेतून एकता या विषयावर स्नेहसंमेलन सादर करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे बालरोग तज्ञ डॉ.अश्विनकुमार वाघमोडे तसेच शालासामिती अध्यक्ष मा.श्री.अजय पुरोहित सर व स्थानिक समन्वयक श्री.पी.बी.कुलकर्णी सर यांच्या उपस्थिती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
शुक्रवार दि .१० /१ /२५ रोजी शेकोटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली .शेकोटी हि परंपरा अतिशय जुनी असून आता ती विसरत चाललेल्या आधुनिक कला मध्ये आपल्या मुलांना या परंपरेचे ज्ञान व पूर्णपणे माहिती मिळावी याकरिता हा उपक्रम राबविला.हा उद्देश साध्य होण्याकरिता मा.मुख्याध्यापिका अनिता ताईंनी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली.तसेच मुलांना लघु चित्रपट दाखवण्यात आला.
"वसुधैव कुटुम्बकम "या उपक्रमाला अनुसरून आपल्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये भारतमाता पूजन सप्ताहाचे सोमवार दि.२०/१/२०२५ ते रविवार दि.२६/१/२०२५ पर्यंत आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांसाठी गटानुसार वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये तिरंगा रंगभरण ,रांगोळीतून तिरंगा काढणे ,देशभक्तीपर अभिनायगीत व देशभक्तीपर नृत्य इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शनिवार दि .१/२/२०२५ रोजी मोठ्या गटाची सहल निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र तरडोली येथे नेण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निसर्गाची तसेच निसर्गात असणाऱ्याप विविध पक्षांची,प्राण्यांची, फुलांची, फळांची, वनस्पतींची मुलांना ओळख करून देण्यात आली.