२३ जून १९८६ रोजी शाळा सर्वप्रथम सभागृहात भरत होती. सन १९८६ रोजी छोटागट, मोठागट, व इ.१ ली चा वर्ग सुरु झाला. त्या वर्षी छोटयागटात २५, मोठ्यागटात २८, व इ.१ लीत २१ विद्यार्थी संख्या होती.
सन १९९० हे वर्ग म.ए.सो. मुलांचे हायस्कूल मध्ये भरू लागले. सन १९९८ पासून हे वर्ग कन्या प्रशालेत भरू लागले सन १९९१ रोजी शाळेची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. शाळेच्या इमारतीचे एकूण ६ वर्ग खोल्या बांधण्यात आल्या.
सन १९९१ साली स्वतंत्र इमारतीत दोन विभागात म्हणजे पूर्व प्राथमिक सकाळी व प्राथमिक शाळा दुपारी अशी शाळा भरू लागली. सन १९८६ पासूनच विद्यार्थी संख्या वाढत गेली सन १९९३ पासून वर्ग वाढल्याने व विद्यार्थी संख्या वाढल्याने वर्ग म.ए.सो. मुलांचे हायस्कूल येथे भरू लागले.
२०१३ पासून खेळवाडीचे दोन वर्ग कन्या विभागात सुरु करण्यात आले. वर्गातील भिंतींवर व वर्गाबाहेरील भिंतींवर चित्रे काढण्यात आली. विद्यार्थी संख्या ७० इतकी होती. परंतु मुले लहान असल्याने टॉयलेटची समस्या व कमतरता जाणवली म्हणून २०१४ मध्ये ४ टॉयलेट बांधण्यात आले.
सन २०१३ रोजी शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन मा.डॉ. यशवंतराव वाघमारे सर अध्यक्ष) तसेच मा. श्री भरत व्हनकटे महामात्र स्थानिक शालासमिती सदस्य यांच्या हस्ते झाले. व २०१५ पासून शाळेचा दुसरा मजला ही बांधण्यात आला. पूर्णपणे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग स्वतंत्र इमारतीत भरू लागली. एकूण ६ वर्ग खोल्या वरच्या बाजूला नव्याने बांधण्यात आल्या.
तरीही पूर्व प्राथमिक विभागाचे खेळवाडीचे २ वर्ग आजही कन्या विभागातच भरत आहेत. स्वतंत्र पूर्व प्राथमिक व प्राथमिक नवीन इमारतीत २ वर्गांची गरज प्रकर्षाने जाणवते.
शाळेची स्थापना – २३ जून १९८६
शाळा मान्यतापत्र – जोडलेले आहे
म.ए.सो.पूर्व प्राथमिक विभाग
क्र. | विदयार्थी संख्या | खेळवाडी | छोटागट | मोठागट | एकूण |
---|---|---|---|---|---|
१ | १९८६ ते १९८७ | _ | _ | _ | ५३ |
२ | १९८७ ते १९९२ | _ | ११८ | ९५ | २१३ |
३ | १९९३ ते १९९८ | _ | १२८ | ९८ | २२६ |
४ | १९९९ ते २००४ | _ | १४० | १०३ | २४३ |
५ | २००५ ते २०१० | _ | १३६ | १०९ | २४५ |
६ | २०११ ते २०१६ | _ | १९७ | १४५ | ३४२ |
७ | २०१७ ते २०१८ | ९२ | १४० | १४८ | ३८० |
८ | २०१८ ते २०१९ | ८८ | १३९ | १४५ | ३७२ |
९ | २०१९ ते २०२० | ९० | १२६ | १४३ | ३५९ |