मुख्याध्यापिका परिचय – प्राथमिक विभाग

मुख्याध्यापिका-सौ.मोनिका उदय खेडलेकर.
शैक्षणिक पात्रता-बी.ए.डी.एड.
अनुभव-३३ वर्ष.
विशेष कार्य-जिल्हा परिषद पुणे आदर्श शिक्षक पुरस्कार.

सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही एक राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने सुमारे १६४ वर्ष पूर्ण करत असलेली देशातील एक नामवंत शिक्षण संस्था आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके कै.वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी स्थापन केलेली भारतमातेच्या थोर देशभक्त सुपुत्रांनी या शिक्षण संस्थेचे स्थापना करून पारतंत्र्यातही सर्वांना शिक्षण मिळावे या हेतूने हि ज्ञान ज्योत प्रज्वलीत ठेवली. कविवर्य मोरोपंतांच्या बारामती नगरी येथील उपक्रमशील व विकासात अग्रगण्य असलेली ३८ वर्ष योगदान देणारी आपली म.ए.सो. सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, बारामती या शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून शाळेत विविध उपक्रम, कार्यक्रम, पालक स्पर्धा, व्याख्याने , शिक्षकांसाठी कार्यशाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. विद्यार्थ्यांसमवेत कुटुंबातील सर्वच घटक शाळेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रमाचा नियोजनात सहभाग नोंदवून नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवून त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संस्था सतत प्रयत्नशील असते. त्या धोरणांतर्गत त्यांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास व्हावा या हेतूने विविध क्षेत्रभेटीचे आयोजन करणे, सहली काढणे या गोष्टींचा समावेश असतो.शिक्षक, पालक यांच्यासाठी शिक्षण प्रबोधिनी अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांची स्व ओळख, वयोगटांनुसार वाढ, विकास, संगोपन, शिस्त, सक्षम पालकत्व पालक-,बालक संवाद इत्यादी विषयावरती पालकांना मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाते. विद्यार्थी सक्षम करण्याचे उत्तम कार्य म.ए.सो. मध्ये केले जात आहे. अशी ही आमची म.ए.सो. सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय कालानुरूप मातृभाषेतून शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम, उद्योजकता, कौशल्य विकास, व्यवस्थापन, आरोग्य, विज्ञान क्रीडा, पर्यावरण ,संवर्धन, महिला सक्षमीकरण ,समाज प्रबोधन व सामाजिक कार्य अशा बहुविध क्षेत्रात म.ए.सो ने जो आपला ठसा उमटवीत सातत्याने क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे बोधवाक्य सार्थ ठरविले आहे.

 

 

Scroll to Top