उल्लेखनीय उपक्रम/कार्यक्रम

 

शिक्षक कथाकथन स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी मा.मुख्याध्यापिकांच्या प्रोत्साहनाने शिक्षक कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यात शाळेच्या या वर्षीच्या उपक्रमाला अनुसरून खेळाडूंच्या जीवनप्रसंगावर आधारित उत्कंठावर्धक कथा शिक्षकांनी मुलांना सांगितल्या. यातून जिद्द, चिकाटी, प्रयत्न, आत्मविश्वास, यश खेळातून मिळणे शक्य होते हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसले व खेळांच्या स्पर्धांसाठी त्यांची मानसिकता तयार होण्यास मदत झाली.

 

आंतरशालेय स्तरावर तसेच शाळा व जिल्हा स्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांची भरीव कामगिरी

दरवर्षी म.ए.सो आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो.या क्रीडा स्पर्धा जिंकून शाळेने सलग ७ वर्षे अत्यंत मानाचा समजला जाणारा म.ए.सो क्रीडा करंडक मिळवून शाळेच्या व क्रीडा क्रीडावर्धिनीच्या पर्यायाने म.ए.सो च्या  इतिहासात सोनेरी नोंद केली आहे.

शाळेला भेट दिलेल्या मान्यवर व्यक्तींचा तपशील खालील प्रमाणे

शाळेत स्थापन केलेल्या महिला तक्रार समितीअंतर्गत मा.अॅड. निलीमाताई गुजर यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन महिलांचे हक्क, महिलांसंदर्भात कायदे, सायबरगुन्हे, ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या वर्षीचा शाळेचा प्रकल्प ‘जाणीव  पर्यावरणाची’ या अंतर्गत विद्यार्थ्यांची पर्यावरणव आरोग्य या विषयावर  प्रसिद्ध डॉ.उज्वला शेखर कोठारी यांनी मुलांना आरोग्य, आहार व पर्यावरण महत्व किती अनन्यसाधारण आहे हे चर्चेतून पटवून दिले.

 

इतर शाळांशी तुलना करता शाळेची खास वैशिष्ट्ये

ETH संगणक प्रणालीचा प्रथम वापर करणारी बारामती शहरातील एकमेव प्राथमिक शाळा, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ETH  सुरु करण्यात आले आहे.

आंतरशालेय नाट्यछटा व कथाकथन स्पर्धा-
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त-कलागुणांना वाव मिळावा व व्यासपीठ मिळावे या हेतूने शाळेच्या रौप्य महोत्सवापासून आपल्या शाळेतर्फे दरवर्षी आंतरशालेय नाट्यछटा व कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

माझी विद्यार्थी मेळावा
शाळेत झेंडावंदनासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. माझी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांशी संपर्क साधून जास्तीत जास्त संख्येने  झेंडावंदनासाठी उपस्थित राहण्याचे ठरवले होते. सर्व माजी विद्यार्थी झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर  आपापल्या वर्गात जाऊन बसले, आपापल्या बाकावर बसले.शाळेच्या काही आठवणी त्यांनी एकमेकांना सांगितल्या व जुन्या आठवणीत हे विद्यार्थी रमले.आपापल्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनी अनेक फोटो काढले व त्याही आठवणी जतन करण्याचा प्रयत्न केला.

शाळेची शैक्षणिक, सामाजिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक कामगिरी

सन २०२४/२५ दुबई येथे झालेल्या वर्ड माईंड स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बारामतीच्या सुपुत्रांचे घवघवीत यश दिनांक १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान दुबई येथे वर्ल्ड माईंड स्पोर्ट्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप वर्ल्ड स्पोर्ट्स फेडरेशन यांच्यावतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली यात इयत्ता पहिलीतील चि.अर्चित अतुल भुजबळ आणि चि. अक्षय अतुल भुजबळ या दोघांनी दैदीप्यमान यश मिळवत दुबईमध्ये भारताचा झेंडा झळकवला. जिनियस किड्स म्हणून त्यांना बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेत २६ देशातून विद्यार्थी सहभागी झाले होते.

पुस्तक हंडी
शाळेत दरवर्षी दहिहंडी ही पुस्तकहंडी म्हणून साजरी केली जाते. इ. ४ थी च्या मुलांच्या व मुलींच्या गोविंदा पथकाने पुस्तकहंडी फोडल्यानंतर ती पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली जातात.यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते तसेच दहीहंडीचे मनोरे रचताना एकजूट, सहकार्य, सामंजस्य वाढीस लागते.

सामाजिक बांधिलकी
शाळेतर्फे रिमांड होम येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.४ थी च्या  विद्यार्थीनींनी रिमांड होम येथे जावून तेथील मुलांना राखी बांधली व शाळेतर्फे त्या मुलांना खाऊ दिला.

ई कचरा संकलन – शाळेत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करून तो नगरपालिकेच्या कचरा संकलनामध्ये देण्यात येणार आहे.

सामाजिक भोंडला – नवरात्रात सामाजिक भोंडला पालकांसाठी घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्त्या मा. मंगलभाभी सराफ व माजी नगराध्यक्षा मा. पौर्णिमाताई तावरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या, यात डॉक्टर महिलांपासून ते सफाई कामगार महिलांपर्यंत सत्कार करण्यात आला.

पालक निबंध स्पर्धा
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पालकांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.निबंध स्पर्धेसाठी पालकांना खालील विषय देण्यात आले होते

  • मुलांसाठी खेळाचे महत्व.
  • मुलांचे आरोग्य

शाळेची क्रीडाविषयक वाटचाल
माहेवार आसने व सूर्यनमस्कार स्पर्धा- यावर्षी ‘खेळातून आरोग्यसंवर्धन’ या प्रकल्पाअंतर्गत माहेवार आसने घेण्यात आली. दररोज आसनांचा सराव व प्रात्याक्षिके घेण्यात आली. जानेवारी महिन्यात सूर्यनमस्कार व आसनस्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमुळे मुलांना व्यायामाची आवड निर्माण झाली.आत्मविश्वास वाढला व लहान वयातील चंचलता कमी होण्यास मदत झाली.

शाळेची सांस्कृतिक वाटचाल
स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रसंग नाट्यातून इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय तडफदारपणे सादर केले. तर इ १ ली व २ री ने देशभक्तांच्या वेशभूषा करून छोटे छोटे संवाद सादर केले.यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीषकुमार यांच्या जीवनावर आधारित बालनाट्यांचे सर्वांनाच खूप कौतुक वाटले.

नागपंचमी निमित्त सर्प चित्र प्रदर्शन सर्पमित्रांकडूनमाहिती – जाणीव पर्यावरणाची उपक्रमा अंतर्गत शाळेमध्ये नागपंचमीचे औचित्य साधून सर्पमित्रांकडून अनेक सापांची माहिती यात विषारी सर्प बिनविषारी सर्प तसेच सापांचे जीवन त्याचबरोबर प्रत्येक सापांचे वैशिष्ट्य या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्या सर्व सर्पाचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले.

Scroll to Top