पूर्व प्राथमिक शालेय उपक्रम २०२५-२६
सोमवार दि.१६/६/२०२५ रोजी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आई- बाबा समवेत विद्यारंभ संस्काराने करण्यात आली तसेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सहसचिव मा.श्री सुधीर भोसले सर यांनी विध्यार्थ्यांना सदिच्छा भेट दिली.
अष्टांग योगासारखा दुसरा असा उपाय नाही, म्हणूनच म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक २१/६/२०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विदयार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षक व विदयार्थी यातील दुवा म्हणजे पालक यांच्यात समन्वय साधावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सोमवार दि.३० /६ /२०२५ रोजी पालकशाळेचे आयोजन करण्यात आले.
म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळेत मुलांनी केला संकल्प.संकलित बियांचे सीड्स बॉल वारकऱ्यांना वाटून ,केला पर्यावरण जागृती व भारुड ,पथनाट्य,अभंग सादरीकरणातून तसेच विठ्ठल भक्तांच्या प्रसंग सादरीकरणातून शाळेत पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला .
























