‘जागर कृतीशील पर्यावरणाचा’

म.ए.सो. सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने केला ‘जागर कृतीशील पर्यावरणाचा’. ‘जाणीव पर्यावरणाची’ या उपक्रमा अंतर्गत शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबवले. या उपक्रमातील शेवटचा टप्पा म्हणजे ‘जागर कृतीशील पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम आज दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी शाळेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री.राजेंद्र सोनवणे तसेच नगरपरिषद बारामती निरीक्षक श्री. बळवंत झुंज तसेच नगरपरिषद बारामती येथील सौ.नीलम हिरवे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडेलेकर यांनी केले. जाणीव पर्यावरणाची या संपूर्ण प्रकल्पास शाळेचे अध्यक्ष श्री.अजयजी पुरोहित तसेच शाळेचे महामात्र डॉ.श्री.गोविंदजी कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी गोळा केलेला ई कचरा नगरपरिषद अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून वर्षभर पर्यावरण विषयक घेतलेल्या उपक्रमांतून पर्यावरण पूरक जीवनशैली कशी आत्मसात करावी याबाबत विद्यार्थ्यांनी जागर केला.
आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व दिल्ली येथून बारामती तपासणीस येणाऱ्या टीम पुढे हा सुंदर कार्यक्रम सादर करावा अशी मुख्याध्यापकांना विनंती केली. विद्यार्थ्यांनी खरोखर अशा प्रकारे पर्यावरणपूरक जीवनशैली आमलात आणली तर नक्कीच पुढील पिढीस उत्तम आरोग्य मिळेल याबाबत शंका नाही तसेच असे उपक्रम प्रत्येक शाळेतून राबवले गेले तर विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाची जाणीव जागृती होईल असेही त्यांनी मनोगतात व्यक्त केले.

Scroll to Top