दि. २१.०६.२०२६ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेमध्ये १९ जून २०२६ रोजी योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुलांना चेतना व्यायामाचे प्रकार,सूर्यनमस्कार ,बुद्धीला चालना देणारे व्यायाम तसेच सूर्याची बारा नावे व ध्यानधारणा त्याचबरोबर छोटी छोटी प्रात्यक्षिके सर्व ताई व मुलांसमवेत करण्यात आली. शरीर,मन, आणि आत्मा यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग होय. योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयी जागृती निर्माण करण्यात आली.

नमस्कार
संस्थेच्या वतीने पुढील काळात येणारे सण-उत्सव व आपल्या परंपरा या पर्यावरणपूरक या थीमवर सर्वत्र साजऱ्या व्हाव्यात अशा प्रकारची योजना केली आहे. या माध्यमातूनच आपण माजी विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळा-महाविद्यालयांशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित व्हावा व ज्यांची अद्याप पर्यंत नोंदणी झाली नसेल, त्यांची नोंदणीही करून घेता यावी, म्हणून आपण अनेक उपक्रम पुढील काळामध्ये आयोजित करणार आहोत. त्यातील पहिला उपक्रम हा पर्यावरणपूरक पंढरीची वारी असा असेल. या उपक्रमाद्वारे आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करावयाचे आहे की आपण पंढरीच्या वारीच्या मार्गावर अथवा ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी एक भारतीय वंशाचे झाड लावावे व त्याचा फोटो वर दिलेल्या फ्लायर्समध्ये दिलेल्या क्यूआर कोड वरती स्कॅन करून पाठवावा.
सर्वांना पंढरीच्या वारीच्या खूप खूप शुभेच्छा!
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख करून देत भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि नैतिक मूल्याचे संस्कार रुजविण्याच्या हे तुने महेश पूर्व प्राथमिक शाळेत त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड्स बॉल वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.प्रवासादरम्यान हे सीड्स बॉल रस्त्यालगत टाकल्यास त्यातून वृक्षांची वाढ होऊन हरितसंवर्धनास हातभार लागावा हा या उपक्रमामागील उद्देश होता .





















