Primary School 2025-26
म. ए .सो. सौ .निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम या जय घोषात पालखीचे आयोजन केले होते .विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण जनजागृती करणाऱ्या दिंडीचे उदबोधकअशा, 'झाडे लावा झाडे जगवा ,झाडआहे हिरवेगार, वारा देते थंडगार' घोषणा दिल्या .
विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव निर्माण व्हावा त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावे या हेतूने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये काही विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी ,ज्ञानेश्वर ,तुकाराम मुक्ताबाई, नामदेव, सोपानदेव अशी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते. या पर्यावरण पूरक दिंडीस शाळेचे मा. अध्यक्ष अजयजी पुरोहित व शाळेचे महामात्र मा. डॉ.गोविंदजी कुलकर्णी यांचे तसेच मा. मुख्याध्यापिका खेडलेकर मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.पालखीचे पूजन करून आरती करण्यात आली. वृक्षदिंडी काढण्यात आली.मुलींचे कन्या विभाग तेथे पालखीचे स्वागत माननीय पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनींनी केले.
छोट्या वारकऱ्यांनी रिंगण सोहळा गजराच्या नादावर नृत्य, फुगडी प्रदक्षिणा घालून अवघा शालेय परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून काढला .पालखी सोहळ्यातील भक्तीमय वातावरणाने संपूर्ण शालेय परिसर विठ्ठलमय होऊन गेला. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पालखीच्या प्रसादाचे वाटप केले गेले.
गुरु असतो ध्यास कीर्तीचा
गुरु असतो श्वासपूर्तीचा
गुरु असतो मार्ग यशाचा
गुरु असतो किरण यशाचा
माणूस हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ समजला जातो . कारण माणसाजवळ विद्या आहे ही विद्या देण्याचे काम गुरूच करतात .पहिला गुरु म्हणजे आपले आई-वडील आणि दुसरा गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक असतात .आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा!
शाळेमध्ये गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक 10/7 /2025रोजी साजरी करण्यात आली शाळेतील शिक्षक श्री गुरुकुले सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना गोष्टीतून सांगितले. माननीय मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडलेकर मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतरकर्मचारी यांच्या हस्ते महर्षी व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरु शिष्यांच्या छान छान गोष्टी सांगितल्या .शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचा श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर मॅडम यांनी आई-वडील, गुरुजी, शिक्षिका यांच्याबरोबर निसर्ग व निसर्गातील काही प्राणी हे देखील आपले गुरू असतात हे गोष्टी रुपात विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मा. अध्यक्ष श्री अजयजी पुरोहित , शाळेचे महामात्र मा. डॉ. गोविंदजी कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमास पूर्व प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी शिक्षक मा.रमेश झाडबुके सर होते. प्रथम शक्ती, बुद्धी दाता हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. मा.मुख्याध्यापिकांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. योग दिन माहिती विद्यार्थ्यांना सांगून मा. झाडबुके सरांनी पूरक व्यायाम, आसने,सूर्यनमस्कार, हास्ययोग ध्यानधारणा हे सर्व घेतले. मुलांना पौष्टिक आहार व सूर्यनमस्कार महत्त्वाचे आहेत हे पटवून देणारी कथा माननीय झाडबुके सरांनी सांगितली. अतिशय उत्साहात,आनंदात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून साजरा करण्यात आला.
२३ जून १९८६ साली स्थापन झालेल्या म.ए.सो. सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास प्राथमिक विभाग मा. मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडलेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा वर्धापन दिनानिमित्त फुलांच्या माळा, फुगे लावून शाळा सजवण्यात आली. शाळेला तोरण लावून रांगोळ्या काढण्यात आल्या. मुलांनी शाळेसाठी सुंदर भेटकार्ड तयार केली.
यात पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समाविष्ट झाले होते. संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर म. ए. सो.गीत गायले गेले.
संस्थेचा इतिहास व म. ए.सो. सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेविषयी, शाळेने आज पर्यंत मिळवलेल्या यशाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली गेली. विद्यार्थ्यांना शाळेच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.









